गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीतही अवघ्या १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यावेळी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीतील आणखीन निर्णय याप्रमाणे

विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ

( ऊर्जा विभाग)

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

(अल्पसंख्याक विकास विभाग)

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी

(विधी व न्याय)

इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा

( गृहनिर्माण)

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment