केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे आज मंगळागौर व पारंपरिक फेरनृत्य स्पर्धा

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यातील कौशल्यांचा विकास व्हावा व महिलांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने केअर ऑफ नेचर सामाजिक संख्या वेश्वि महाराष्ट्र राज्य तर्फे गुरुवार दि 12 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता श्री साई देवस्थान, साई नगर,वहाळ ता: पनवेल. जि. रायगड येथे महिलांसाठी मंगळागौर व पारंपरिक फेर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 7000 रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 5000 रू व सन्मान चिन्ह , तृतीय क्रमांकांस 3000 रुपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर आणि ढोलकीच्या तालावर फायनललिस्ट स्नेहा पतील हिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. महिलांसाठी आयोजित केलेल्या या मंगळागौरी व पारंपारिक फेर नृत्य स्पर्धेत महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.अधिक माहितीसाठी अमृत म्हात्रे फोन नंबर – 9930932350 येथे संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी केले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment