लांजा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वाकेड नं.२ शाळेचे सुयश

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : तालुकास्तरीय शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाकेड नं.२ शाळेचा कबड्डी मोठा गट मुलांचा संघ अंतिम विजेता ठरला आहे. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच कोंडये येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर संपन्न झाल्या.

या स्पर्धांमध्ये वाकेड शाळा क्र.२ या शाळेने भांबेड प्रभागाचे नेतृत्व करीत विजय संपादन केला. आता डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये हा कबड्डी संघ लांजा तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. या संघाला शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भोवड, पदवीधर शिक्षक विजय कदम, उपशिक्षक सुनिल कांबळे, उपशिक्षिका श्रीम. शुभांगी माने तसेच शाळेचा माजी विद्यार्थी कु.वेदांत संदीप सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

कबड्डी संघाच्या या सुयशाबद्दल गटशिक्षणाधिकारी व्ही. वाय बंडगर , भांबेड प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर रणदिवे , कुवे केंद्राचे केंद्रप्रमुख दयानंद लाखण, शाळा व्यवस्थापन समिती शाळा वाकेड नं.२, वाकेड ग्रामस्थ यांनी सर्व खेळाडूंचे, मार्गदर्शकांचे अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment