कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाडीला प्रायोगिक थांबा

Team RatnagiriLive
1 Min Read
रत्नागिरी : तिरूनेलवेली ते दादर दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला दि. 6 मार्च 2024 पासून मुकाम्बीका रोड  बिंदूर स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार तिरुनेलवेली ते दादर दरम्यान धावणारी (22630) एक्सप्रेस गाडी दि. 6 मार्च 2024 च्या फेरीपासून कोकण रेल्वे मार्गावरील मुकाम्बीका रोड हा थांबा घेणार आहे. तिरूनेलवेली ते दादर दरम्यान धावताना ही गाडी रात्री बारा वाजून 32 मिनिटांनी मुकाम्बिका रोड स्थानकावर येणार आहे. त्याचबरोबर दादर ते तिरूनेलवेली (22629) ही गाडी दिनांक 7 मार्च 2024 च्या फेरीपासून मुकांबिका रोड थांबा घेणार आहे. या प्रवासात ही गाडी सकाळी दहा वाजता  मुकाम्बिका स्थानकावर थांबणार आहे
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment