कोकणातून धावणारी उद्याची एलटीटी-कोचुवेली विशेष ट्रेन सव्वा दोन तास विलंबाने धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, मडगाव मार्गे जाते केरळमध्ये

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे उन्हाळी हंगामासाठी सुरू करण्यात आलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली ही वातानुकूलित विशेष गाडी (01463) उद्या दिनांक 2 मे रोजी सव्वा दोन तास उशिराने धावणार आहे.

निर्धारित वेळेनुसार ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उद्या दिनांक 2 मे 2024 रोजी सायंकाळी 4:00 वाजता सुटणार होती. मात्र, कोचुवेली येथून येणारी कनेक्टेड गाडी विलंबाने धावत असल्यामुळे डाऊन दिशेने सुटणारी ही गाडी मुंबईतून गुरुवारी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार आहे. म्हणजेच निर्धारित वेळेपेक्षा ही गाडी सव्वा दोन तास उशिराने सुटणार आहे.

निर्धारित वेळेनुसार ही गाडी चिपळूण ला सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तर रत्नागिरीला 45 मिनिटांनी येते. मात्र, दोन मे 2024 रोजी च्या प्रवासासाठी ही गाडी रिशेड्युल करण्यात आल्यामुळे सुटण्याच्या ठिकाणावरूनच ती सव्वा दोन तास उशिराने निघणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment