कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट गाड्या महिनाभर सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • सीएसएमटी जंक्शनवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवास आधीच संपणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक ७ जुलै २०२४ पर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी जंक्शन ऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 4 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील दहा अकरा बारा तेरा या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

या कामामुळे मंगळुरू जंक्शन ते सीएसएमटी (12134), मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (22120) तेजस एक्सप्रेस तसेच मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी दरम्यान रोज धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस(12052) या तिन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक सात जुलै 2024 पर्यंत त्यांचा मुंबई दिशेने होणारा प्रवास दादरलाच संपवणार आहेत.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment