संतोष गायकवाड यांची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती

Team RatnagiriLive
1 Min Read
  • अरुण चवरकर यांनी केला सत्कार

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले संतोष गायकवाड यांची उरण शहराच्या पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे अध्यक्ष अरुण चवरकार व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

संतोष गायकवाड यांनी काही वर्ष पनवेल वाहतूक पोलिस म्हनून चांगली कामगिरी केल्याने वरिष्ठांनी ही कौतुक केले आहे. त्यानंतर क्राईम ब्रांच बेलापूर येथे अनेक वर्षे कौतुकास्पद कामगिरी करून पोलिस खात्यात आपल नाव लौकीक केलं. आजही परराज्यातून आरोपी शोधून आणायचे असेल तर संतोष गायकवाड यांच्यावर कामगीरी सोपवली जाते आणि ते जबाबदारी पूर्ण करून दाखवतात असे उदगार सत्कार करताना उपस्थित उरणचे पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी पत्रकारांना सांगितले. संतोष गायकवाड यांनी अनाथ मुलींना दत्तक घेऊन शिक्षण देऊन लग्न लावून दिलं. या सत्कार प्रसंगी, एपीआय खाडे, महेश भोईर, विकास गुरसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment