उरणमधील रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : श्रीमदपुरुषार्थ ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. कारण परमात्म्याला आवडणाऱ्या ९ थेंबापैकी एक थेंब म्हणजेच रक्ताचा थेंब आहे. ह्या दानामुळे परमात्म्याची कृपा प्राप्त होते व पुण्यसंचयही होतो. या विचारनुसार श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन व दिलासा मेडिकल ट्रस्ट व सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण मुळेखंड तर्फे उरण नगर पालिका शाळा नंबर १ उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण १७६ रक्तदात्यांनी भाग घेतला त्यामध्ये २३ रक्तदाते काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आले.जे रक्तदाते आले होते त्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करून आभार मानण्यात आले.एकंदरीत १५३ जणांनी रक्तदान केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment