konkan Railway | गणपती विसर्जनानंतर २४ रोजी धावणार मडगाव-मुंबई वनवे स्पेशल गाडी
रत्नागिरी : गणेशोत्सव आटपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेसाठी मडगाव – मुंबई अशी वनवे स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता ही गाडी गोव्यातील मडगाव येथून सुटणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01592 ही वन-वे स्पेशल गाडी मडगाव जंक्शन येथून दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि रात्री 10 वाजून 55 मिनिटांनी ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे.
दिनांक 23 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन असल्याने कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांची परतीसाठी गर्दी होणार आहे. यामुळे मडगाव येथून मुंबईसाठी सुटणारी ही गाडी परतीच्या प्रवासाला निघणाऱ्यांसाठी सोयीची होणार आहे.
या थांब्यावर थांबणार!
ही वनवे स्पेशल गाडी करमाळी थिवी, मडूरे, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी, राजापूर रोड, विलवडे, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, माणगाव, रोहा, पनवेल तसेच ठाणे या स्थानकांवर थांबे घेणार आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणारी ही गाडी 18 डब्यांची एलएचबी श्रेणीतील असणार आहे.