- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करून मागणी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : NEET ( नीट ) परीक्षा पेपर फुटीची नैतिक जबाबदारी घेऊन देशातील २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आंधकारमय करणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उरण मध्ये मार्क्सवादी कॅम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.
देश भरात मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली. त्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे टी परीक्षा १२ मे रोजी रद्द करण्यात आल्याने २३ लाख विध्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास झाला आहे. लाखों विदयार्थ्यांनी गेल्या दोन तीन वर्षे प्रचंड मेहनत घेतली तसेच लाखों रुपये खर्च केले परंतु परीक्षा रद्द केल्याने त्यांना पुढील महिन्यात परत परीक्षा द्यावी लागणार आहे. पेपर फोडणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी ही मागणी करण्यात आली.
ही परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA ) चे चेअरमन प्रदीप जोशी यांना अटक करा. पेपर फोडणारे प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे तसेच पेपर विकणारे कोचिंग क्लास मालक शिवराज मोटेगावकर व इतर सर्वांवर यांना मोठी शिक्षा करा म्हणजे भविष्यात अशी पेपर फुटीचे प्रकार होणार नाहीत. हा अपराध करणारे सर्वजण सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहेत कारण त्यांची नियुक्ती सरकारने केली आहे म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही राजीनामा द्यावा ही मागणी देशभर होतं आहे.
या निदर्शन प्रसंगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे, सिटू चे कामगार कॉ. भूषण पाटील, जनवादी महिला संघटना नेत्या कॉ. हेमलता पाटील किसान सभा नेते कॉ. संजय ठाकूर व कामगार नेते शशी यादव यांनी आपल्या भाषणतून पेपर फुटीचा निषेध केला. या कार्यक्रमाला अनेक कामगार, महिला युवक संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.
