उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात

Team RatnagiriLive
2 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा  शिकवली जाणार आहे. जपानमधील करिअरच्या संधी लक्षात घेऊन तसेच भारतातील विविध जपानी कंपन्यांमध्ये   कार्य करण्यासाठी जापनीज भाषा येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उरण सारख्या ठिकाणी अश्या प्रकारची भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वर्गाचा नुकताच उदघाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

या वेळी कपिल पाटील शैक्षणिक संस्थेचे चेअरमन तथा कोकण ज्ञानपीठचे अध्यक्ष कपिल पाटील  (माजी मंत्री, भारत सरकार) कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी जपानची टेक्नॉलॉजी शिकून भारताच्या प्रगतीसाठी तिचा वापर करावा २०४७ चा विकसित भारत घडवण्यात  तरुणांनी योगदान द्यावे असे प्रतिपादन केले या प्रसंगी जपानच्या महा वाणिज्य दुतावास मधील संशोधक सल्लागार  हिदेयुकी मिहारा उपस्थित होते त्यानीं जपान मधील करिअरच्या संधी याविषयी माहिती सांगून विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने जपानी शिकावी, असे प्रतिपादन केले व जपानी भाषेतून आपले करिअर घडवावे यासाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे यांनी केले व अभ्यासक्रम आयोजित करण्याचा उद्देश सांगितला. याप्रसंगी मिलिंद संत यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवणार आहेत. कार्यक्रमात कोकण ज्ञानपीठचे सीईओ  प्रदीपचंद्र शृंगारपुरे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रमेश ठाकूर, विशाल पाटेकर ( अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ), प्राचार्य मोहन काळे ( राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय,  कर्जत) प्राचार्य विलास पिल्लेवान  (कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जत), कु, पुजा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हन्नत शेख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टी एन घ्यार व प्रा. रियाज पठाण यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जापनीज भाषा प्रशिक्षण शिबिरात प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment