रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने सावंतवाडी रोड ते सोलापूर जंक्शन दरम्यान एकतर्फी (One-Way) विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची माहिती
- गाडी क्रमांक: ०१००२ (सावंतवाडी रोड ते सोलापूर जंक्शन वन-वे स्पेशल)
- प्रस्थान: शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०६:३० वाजता (सावंतवाडी रोड येथून)
- आगमन: शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ०१:३० वाजता (सोलापूर जंक्शन येथे)
- कोच रचना: एकूण १६ एलएचबी (LHB) कोच — १ फर्स्ट क्लास, २ एसी टू-टायर, ३ एसी थ्री-टायर, ४ स्लीपर क्लास, ४ जनरल क्लास, १ एसएलआर/डी आणि १ जनरेटर कार.
प्रमुख थांबे
ही विशेष रेल्वे कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, लोणावळा, पुणे जंक्शन, दौंड जंक्शन आणि कुर्डूवाडी जंक्शन या स्थानकांवर थांबेल.
वेळापत्रक आणि अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या enquiry.indianrailway.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘KR Mirror’ ॲप डाउनलोड करावे.
