Konkan Railway | कोकणात येणाऱ्या ‘या’ तीन महत्त्वाच्या ट्रेन सुटल्या उशिरा 

Team RatnagiriLive
1 Min Read
  • गाडी क्रमांक: १०१०३ सीएसएमटी – मडगाव जंक्शन मांडवी एक्स्प्रेस
  • ​मूळ वेळ: सकाळी ०७:१० वाजता
  • ​सुधारित (नवी) वेळ: सकाळी ०९:०० वाजता (२७/०९/२०२६)
  • ​विभाग: मध्य रेल्वे, मुंबई विभाग

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून कोकण मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून मडगाव जंक्शनकडे जाणारी गाडी क्र. १०१०३ ‘मांडवी एक्स्प्रेस’ (Mandovi Express) च्या वेळेत बदल (Rescheduled) करण्यात आला आहे. आज २७ रोजी सुटणाऱ्या या गाडीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी विशेष गाडी (01131) तसेच 11099 ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेसही दोन तास 45 मिनिटे उशिरा सुटली.

​मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०७:१० वाजता सुटणारी ही ट्रेन आता सकाळी ०९:०० वाजता सीएसएमटीवरून मडगावसाठी रवाना होईल. वेळेत झालेल्या या बदलामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

​कोकण मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी या सुधारित वेळेची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment