- इरोड ते उधना वन-वे स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक जाहीर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी खूशखबर आहे. दक्षिण रेल्वेने कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली ‘अमृत भारत’ रेक (Amrit Bharat Rake) असलेली इरोड – उधना वन-वे एक्सप्रेस स्पेशल ट्रेन (ट्रेन क्र. 06197) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन ३० सप्टेंबर २०२६ रोजी इरोडहून सुटणार असून १ ऑक्टोबर २०२६ रोजी उधना येथे पोहोचेल.
ट्रेनचे वैशिष्ट्य आणि डब्यांची रचना (Coach Composition):
अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या ट्रेनमध्ये एकूण २० डबे (Coaches) असतील:
- स्लीपर क्लास (Sleeper Class): ८ डबे
- जनरल सेकंड क्लास (General Second Class): १० डबे
- दिव्यांगजन स्नेही (Divyangjan Friendly Second Class): २ डबे
वेळापत्रक आणि कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख थांबे:
- प्रारंभ: इरोड (Erode) – ३० सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ०८:१५ वाजता सुटेल.
- अंतिम स्थानक: उधना (Udhna, गुजरात) – ०१ ऑक्टोबर २०२६ (गुरुवार) रोजी रात्री २२:०० वाजता पोहोचेल.
कोकण रेल्वे मार्गावरील मुख्य थांबे आणि वेळा (आगमन / प्रस्थान):
- कारवार (Karwar): रात्री ०१:३० / ०१:३२
- मडगाव (Madgaon): रात्री ०२:३० / ०२:४०
- थिविम (Thivim): पहाटे ०३:३० / ०३:३२
- सावंतवाडी रोड (Sawantwadi Road): पहाटे ०४:१२ / ०४:१४
- कणकवली (Kankavali): सकाळी ०५:०० / ०५:०२
- रत्नागिरी (Ratnagiri): सकाळी ०७:३० / ०७:३५
- संगमेश्वर रोड (Sangameshwar Road): सकाळी ०८:१६ / ०८:१८
- चिपळूण (Chiplun): सकाळी ०८:५० / ०८:५२
- खेड (Khed): सकाळी ०९:४० / ०९:४२
- माणगाव (Mangaon): सकाळी ११:४० / ११:४२
- रोहा (Roha): दुपारी १२:४० / १२:४५
- पनवेल (Panvel): दुपारी १३:५० / १३:५५
- वसई रोड (Vasai Road): दुपारी १५:५० / १५:५५
