रत्नागिरीच्या भाट्ये समुद्र किनाऱ्यावर सामूहिक स्वच्छता मोहीम

Team RatnagiriLive
1 Min Read

सामुदायिक उपक्रमातून किनारा झाला चकाचक!

रत्नागिरी : भाट्ये सागरी किनारा येथे रविवारी “सागरी किनारा स्वच्छता मोहीम” राबविण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत झालेल्या या उपक्रमातून चकाचक झाला. या मोहिमेमध्ये  जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी, किर्तीकिरण पुजार तसेच नागरिक, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-20 परिषद या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाट्ये समुद्रकिनारा या ठिकाणी रविवार, दि.21 मे 2023 रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत समुद्रकिनारा सामूहिक स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment