कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आली खुशखबर!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • कोकणातून धावणारी उधना- मंगळुरू एक्सप्रेस उद्या जादा डब्यासह धावणार!


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी उधना – मंगळुरू एक्सप्रेस उद्या दि. 5 जानेवारी 2024 रोजी ज्यादा डब्यासह धावणार आहे. पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या प्रचंड गर्दी सह धावत असल्याने रेल्वेने सध्या धावत असलेल्या गाड्यांना अतिरिक्त कोच जोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उधना ते मंगळूरु (09057) या मार्गावर धावणारी विशेष गाडी 5 जानेवारी रोजी तर मंगळुरू ते उधना मार्गावर 6 जानेवारी 2024 धावणारी विशेष गाडी (09058) स्लीपर श्रेणीच्या एका अतिरिक्त डब्यासह धावणार आहे.

गुजरातमधील सुरतजवळील उधना ते मंगळुरू दरम्यान चालवण्यात येणारी ही गाडी वसई रोड पनवेल, रत्नागिरी मार्गे कर्नाटकमध्ये मंगळूरूला विसावते. मागील काही महिन्यांपासून ही गाडी विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment