उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाली येथील हेलिपॅडवर स्वागत

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाली येथील हेलिपॕडवर आगमन झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. नाणीज येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment