विलास होडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सूर्यकांत सुर्वे व रामचंद्र कुवळेकर यांना

Team RatnagiriLive
1 Min Read

देवरुख दि. ३० : घरावर तुळशीपत्र ठेवणे या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे विलास होडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार सूर्यकांत सुर्वे, शृंगारपूर व रामचंद्र कुवळेकर, निवे बु।। यांना देण्यात येणार आहे. विलास होडे यांच्यासारखे काम करणाया व त्यांना अभिप्रेत असलेले काम सातत्याने करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

रामचंद्र कुवळेकर
सूर्यकांत सुर्वे

अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळाला सातत्याने सहकार्य व विलास होडे यांचेबरोबर सातत्याने संघर्षात उतरणाऱ्या सूर्यकांत सुर्वे, शृंगारपूर व बहुजन विकास आघाडीची स्थापना, सहकारी क्षेत्रातील काम व बेदखल कुळांच्या प्रश्नांची लढाई लढणाऱ्या रामचंद्र कुवळेकर, निवे बु।। यांची विलास होडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

सोमवार दि. १ जुलै २०२४ रोजी विलास होडे यांच्या १६ व्या स्मृतिदिन दिवशी कारभाटले हायस्कूल, कारभाटले येथे होणाया पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पुरस्कार निवड समिती प्रमुख युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment