रत्नागिरीत लवकरच साकारणार मँगो पार्क!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात निवेंडी परिसरात मँगो पार्क उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या माध्यमातून आंबा प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.

राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी परिसरात मॅंगो पार्क होऊ घातले आहे.

100 एकर क्षेत्रात होणार प्रकल्प

निवेंडी परिसरातील शंभर एकर क्षेत्रात मँगो पार्क साकारले जाणार आहे. यासाठी निवेंडी येथील 91.23 हेक्टर तर तळेकर वाडी येथील 7.56 अशी एकूण शंभर एकर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मॅंगो पार्कच्या उभारणीनंतर येथे आंब्यावरील प्रक्रिया उद्योग उभारणी करणे शक्य होणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment