इंटक संघटना असंघटीत व संघटीत कर्मचाऱ्यांच्या सदैव पाठीशी :  कामगार नेते महेंद्रशेठ घरत

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज यांचे द्विवार्षीक अधिवेशन व अजय विठोबा जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे रविवार दि. ३० जून २०२४ रोजी नविन पनवेल येथे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उदघाटन इंटकचे राष्ट्रीय सचिव, कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याहस्ते करण्यात आले. सॉर्टींग पोस्टमन अजय विठोबा जाधव हे आपल्या ४४ वर्षाच्या सेवेनंतर दिनांक ३० जून २०२४ रोजी सेवा निवृत्ती झाले सेवापूर्ती निमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

अधिवेशन उदघाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत म्हणाले की, जगातील सर्वात जास्त सभासद संख्या असलेली इंटक संघटना सदैव देशभरातील संघटीत व असंघटीत कर्मचारी यांच्या पाठीशी ठाम उभी राहील.राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक )ही संघटना देशात एक नंबरची राष्ट्रीय संघटना असून कामगारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी काम करणारी एकमेव संघटना असल्याचे सर्व उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी श्रीमती. सरण्या मॅडम (डि.पी.एस.नवी मुंबई), मोहम्मद साहीद (प्रवर अधिक्षक नवी मुंबई विभाग), प्रकाश शेवाळे (मा. प्रवर अधिक्षक नवी मुंबई), अभिजित इचके (प्रवर अधीक्षक पुणे विभाग), सेंथिल पिल्लई (उपअधिक्षक, मुख्यालय), नितीन येवला (डी.डी.एस. सी.ओ), सुनिल झुंजारराव, निसार मुजावर, टि. एन.राहटे, संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर पोस्टल एम्प्लॉइज युनियनचे शेकडो सभासद उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment