Konkan Railway | मंगळवारची मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस ५.५० ऐवजी सकाळी ९ वाजता सुटणार !

Team RatnagiriLive
1 Min Read
  • कोकण रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत होण्यास काही

    कालावधी जाणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होण्यास काही अवधी जाणार आहे. याच कारणामुळे उद्या मंगळवारी दि.१६ जुलै रोजी मुंबईतून मडगावसाठी सुटणारी तेजस एक्सप्रेस सकाळी ९ वाजता सुटणार आहे.

खेडजवळ कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी रेल्वे बोगद्याजवळ रविवारी सायंकाळी ४ वाजून ४८ मिनिटांनी दरड कोसळून वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आज सोमवारी सायंकाळी दरड हटवून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र रविवारच्या या घटनेनंतर अनेकदा विविध ठिकाणी अडकून पडल्यामुळे या मार्गावरील वेळापत्रक सुरळीत होण्यास काही वेळ जाणार आहे.

दिनांक 16 जुलै 2024 रोजी मुंबईतून मडगावसाठी सुटणारी तेजस एक्सप्रेस (22119) ही तिच्या निर्धारित ५.५० निर्धारित यावेळे ऐवजी रिशेड्युल केलेल्या वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुटणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment