लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवसेना ‘उबाठा’ गटाचे सुभाष लाखण

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवसेना उबाठा गटाचेसुभाष लाखण यांची तर व्हाईस चेअरमनपदी महादेव खानविलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संघाचे मावळते चेअरमन परवेझ घारे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आमदार डॉ. राजन साळवी यांच्या मार्गर्शनाखाली निष्ठावंत कार्यकर्ते गोविंळ गावचे ज्येष्ठ पदाधिकारी सुभाष लाखण यांना एक वर्षाची चेअरमन पदासाठी संधी देण्यात आली आहे. शिवसेना उबाठा गटाचे संचालक यांनी सुभाष लाखण याचं बिनविरोध निवड केली आहे.

लांजा तालुका खरेदी विक्री संघाचे कार्यालयात आज सर्व संचाचालकांच्या उपस्थिती ही निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख संदीप दळवी, सर्व संचालक उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment