अलिबाग विरार काॅरीडाॅर शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविल्या २२५ हरकती

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : अलिबाग- विरार काॅरिडाॅर शेतकरी संघर्ष समिती उरणच्या पदाधिकाऱ्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या व शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी कमी भावात जमिनी देणार नसल्याचे ठामपणे या पदाधिकारी, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या लेखी २२५ हरकती दाखल करण्यात आल्या.

यावेळी अध्यक्ष संतोष ठाकूर, सचिव रवि कासूकर, वसंत मोहीते, खजिनदार महेश नाईक, राजाराम जोशी,रमण कासकर आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान चर्चा करून बैठकिसाथी लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment