लांजा-साटवली मार्गावर मोठे झाड कोसळले ; वाहतूक दोन तास बंद

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : लांजा- साटवली मार्गावर बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोठे झाड पडल्याने मार्गावरील दोन तास वाहातूक ठप्प पडली होती.या घटनेमुळे शाळकरी, महाविद्यालयीत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इसवली व गोळवशी या दोन बस दोन तास उशिराने धावल्यामुळे मुलांचे नुकसान झाले.

बुधवारी सकाळी लांजा-साटवली मार्गावर कोंडये पालयेवाडी येथे मोठे झाड पडले. लांजा ते साटवली व साटवली ते लांजा अशी दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली होती. दोन तास झाले तरी पडलेले झाड हलविण्यात आले नव्हते. लांजा हायसस्कुल, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इसवली व गोळवशी या दोन बस अडकल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये जाण्यासाठी तीन तास उशीर झाला.

स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच नागरिकांनी पडलेले झाड तोडून बाजूला हटवले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड तोडून मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment