Mumbai-Goa highway | महामार्ग तसेच गडनदी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत उद्या पालकमंत्र्यांसोबत बैठक

Team RatnagiriLive
2 Min Read

पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्यापासून जिल्हा दौरा

रत्नागिरी, दि. ८ : उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून दिनांक ९ ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील समस्यांबाबत ग्रामस्थांसोबत बैठक तसेच संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात ते बैठक घेणार आहेत.

पालकमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक, येथे आगमन व पालीकडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता पाली येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वाजता जाकादेवी/खालगांव येथील न.पा.पु. योजना संदर्भात ग्रामस्थांसमवेत बैठक (स्थळ : पाली निवासस्थान, पाली) सकाळी 10 वाजता नॅशनल हायवे NH-६६ संदर्भात हातखंबा तारवेवाडी येथील ग्रामस्थांसमवेत बैठक (स्थळ : हातखंबा तारवेवाडी, निवळी तिठा) सकाळी 11.30 वाजता १) राजापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पासंदर्भात बैठक, २) पाटबंधारे विभाग पाचांबे, ता. संगमेश्वर येथील (गडनदी प्रकल्प) बाधित समस्यांबाबत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 12.30 वाजता दाभोळ वीज प्रकल्प कामगार संघ यांच्या अडचणींसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 1.30 वाजता जे.एस.डब्ल्यू. कंपनीबाबत जयगड सयेवाडी यांच्या अडचणींसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 2 वाजता फिनोलेक्स कंपनीबाबत गोळप व पावस पंचक्रोशीतील कामगारांच्या समस्यांबाबत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी)

याचबरोबर दुपारी 2.30 वाजता नाणार, सागवे आणि बारसु ता.राजापूर येथील ग्रामस्थांसमवेत चर्चा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 3.30 वाजता राखीव. सायंकाळी 4 वाजता प्रादेशिक मनोरूग्णालय, रत्नागिरी येथील सुरक्षा रक्षकांच्या थकीत वेतन व अडचणींसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) सायंकाळी 5 वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.

शनिवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता पावस येथील महिला बचत भवनाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : पावस, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 12 वाजता पावस ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन समारंभ (स्थळ : पावस, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 1 वाजता डोर्ले येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत गावभेट (स्थळ : डोर्ले, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 2 वाजता गावडे आंबेरे येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत गावभेट (स्थळ : गावडे आंबेरे, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 2.30 ते 3.30 वाजता राखीव.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment