भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Team RatnagiriLive
2 Min Read

मुंबईदि. ८ ऑगस्ट २०२४ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिकभिवंडी व कल्याणडोबिंवलीमधील भारतीय जनता पक्षएकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारीमाजी नगरसेवकमाजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नाशिकमधील भाजपा पदाधिकारी व माजी सभापती खलील मिर्झाउषाताई वेंडकुळेतन्वीर तांबोळी खानमुस्ताक कुरेशीछात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पवारसमाधान बागुलविशाल रनमाळे यांच्यासह मुस्लीम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कल्याण डोंबिवलीमधील राकेश मुथा यांच्यासह पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

मागील १० वर्षात महाराष्ट्राला व केंद्राला भारतीय जनता पक्ष नावाची किड लागली आहेलोकशाही व संविधानाला न जुमानता ते काम करत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहेबेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहेशेतकऱ्याला उद्ध्वस्थ केले आहे. आता भाजपा नावाची ही किड सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ज्या उद्देशाने या सर्वांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहेत्यांचा उद्देश विधानसभा निवडणुकीत पूर्ण होईल”असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

टिळक भवन येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडेप्रदेश सरचिटणीस राजेश शर्माराजन भोसलेनाशिकचे प्रभारी बिज्रकिशोर दत्तरोहन टिळककल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटेश्रीकृष्ण सांगळेमदन जाधव आदी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment