Double decker Express | अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्सप्रेसचे दोन डबे वेगळे होऊन मागेच राहिले !

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेस दोन डबे उर्वरित गाडीपासून वेगळे होऊन मागेच राहिले. डबे जोडणारे कपलिंग सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बडोदा विभागात गोठणगाव यार्डानजीक ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी घडली.

दिनांक 15 ऑगस्ट रोजीची गाडी क्रमांक 12932 अहमदाबाद – मुंबई डबल डेकर एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने धावत असताना. बडोद्या नजीक गोठणगाव खेर्डाच्या जवळपास दोन डबे उर्वरित गाडीपासून वेगळे होऊन मागेच राहिले. डबे जोडणारे कपलिंग सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र गाडीपासून वेगळे झालेले डबे पुन्हा जोडण्याच्या कामासाठी प्रवाशांचा खोळंबा झाला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment