Konkan Railway | दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर दोन वन-वे स्पेशल गाड्या

Team RatnagiriLive
1 Min Read

मडगाव-बंगळुरू तसेच कारवार-बंगळुरू मार्गावर धावणार!

मडगाव : दीपावली सणातील गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर दोन वनवे स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. कारवार ते बंगळुरू तसेच बंगळुरू ते मडगाव या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार
कारवार ते सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू  दरम्यान  गाडी (01686) ही वनवे स्पेशल गाडी दिनांक 3 नोव्हेंबर २०२४ रोजी धावणार आहे. याचबरोबर सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी (01685) ही गाडी दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ रोजी धावणार आहे. या दोन्ही वनवे स्पेशल गाड्या वीस डब्यांच्या एलएचबी श्रेणीतील गाड्या असणार आहेत. दीपावली सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment