श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व कार्यांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

उरण तालुक्यातील चिरनेर येथील अक्कादेवी वाडी येथे आदिवासी बांधवांना फराळ वाटप करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते माधव म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते कुमार ठाकूर तर अध्यक्षस्थानी बेलपाडाचे सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने फराळ वाटपाचा कार्यक्रम केला आहे. संस्था नेहमी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविते व सर्वाना मदतीचा हात देते, असे गौरवोदगार यावेळी अध्यक्ष महेश पाटील यांनी काढले. संस्थेच्या कार्याविषयी शिक्षक सनी दिलीप बोरसे यांनी ओळख करून दिली. शेवटी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी उपस्थित सर्वांचे तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सनी बोरसे, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, ओमकार म्हात्रे, प्रेम म्हात्रे, कुमार ठाकूर, भाविक पाटील, सुविधा म्हात्रे, शुभम ठाकूर, माधव म्हात्रे, सानिका म्हात्रे, मुकेश म्हात्रे, समीर पाटील, प्रकाश म्हात्रे आदींनी विशेष मेहनत घेतली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment