दीपावलीनिमित्त रंगावली स्पर्धेतील कलाकृतीनी वेधले नागरिकांचे लक्ष!

Team RatnagiriLive
2 Min Read
  • रंगवली कला दर्शन उरण आणि लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये भव्य रांगोळी प्रदर्शन

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : दीपावली निमित्त रंगवली कलादर्शन उरण आणि लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरातील एन आय हायस्कूल येथे भव्य रांगोळीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ तर संध्याकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी सुरु आहे.रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन एन आय हायस्कूलचे चेअरमन सदानंद गायकवाड, लायन चंद्रकांत ठक्कर, संजीव अगरवाल यांच्या हस्ते शनिवार २/११/२०२४ रोजी झाले. सदर रांगोळी प्रदर्शन हे सर्व नागरिकांना दिनांक ९/११/२०२४ पर्यंत सकाळी १० ते दुपारी १ तर संध्याकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे.थ्रीडी रांगोळी, व्यक्तीचित्र , निसर्गचित्र असे विविध प्रकाराचे रांगोळी काढण्यात आले आहेत.

ज्येष्ठ कलाकार नंदकुमार साळवी यांच्या रांगोळी कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे त्यांच्याही कलाकृतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.रांगोळी कला बघण्यासाठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. नंदकुमार साळवी, दर्शन पाटील, सिद्धार्थ नागवेकर, नवनीत पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर, स्वप्नाली मणचेकर, ध्रुव म्हात्रे, वैष्णवी जाधव आदी कलाकांरानी उत्कृष्ठ असे रांगोळी काढून प्रेषकंची मने जिंकली आहेत.

कलाकारांची कला जनते समोर यावी. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावे. दिवाळीमध्ये नागरिकांना रांगोळी कलेचा आनंद लुटता यावा या दृष्टीकोनातून उरणमध्ये रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आल्याचे सांगत जास्तीत जास्त नागरिकांनी हे रांगोळी प्रदर्शन आवर्जुन पहावे, असे आवाहन नंदकुमार साळवी, राजेश नागवेकर यांच्यासह अन्य कलाकारांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment