Konkan Railway | कोकणातून मुंबईला जायचंय? तुमच्यासाठी आहे शेकडो तिकिटे उपलब्ध असलेली ट्रेन

Team RatnagiriLive
1 Min Read
  • सावंतवाडी-पनवेल स्पेशल १२ रोजी धावणार

रत्नागिरी : कोकण मार्गावर मध्य रेल्वेने दिवाळी हंगामासाठी चालवण्यात आलेली सावंतवाडी-पनवेल दिवाळी स्पेशल १२ नोव्हेंबरला देखिल धावणार आहे. कोकणातून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची कन्फर्म तिकीटे मिळणे अवघड असताना या गाडीला मात्र शेकडे तिकडे उपलब्ध आहेत.

परतीच्या प्रवासात ती १३ नोव्हेंबर रोजी धावेल. ०११७८/०११७७ क्रमांकाची सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सुटून त्याच रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी सावंतवाडी येथे पोहोचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, रोहा स्थानकात थांबेल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment