९२ वर्षीय आजींनी घरातूनच बजावला मतदानाचा हक्क!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : २६६- रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील मतदार जयश्री राजाराम नाईक वय वर्षे ९२ रा. कुंवारबाव यांनी गृहमतदानाचा लाभ घेत आपले मतदान केले.

जिल्ह्यामध्ये आज गुरुवार दि. 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदान होणार आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाचही विधानसभा मतदार संघात तशी सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली आहे. जिल्ह्यातील 85 वर्षापुढील 3 हजार 583 मतदार आणि 592 दिव्यांग मतदारांचे उद्यापासून घरातून मतदान होणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय 85 वर्षापुढील गृह मतदानासाठी पात्र मतदार पुढीलप्रमाणे-
263 दापोली – 817, 264 गुहागर – 768, 265 चिपळूण- 724, 266 रत्नागिरी – 661 आणि 267 राजापूर – 613 अशी एकूण 3583 मतदार.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment