सावर्डे येथील सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या विशाल गोवळकर याला महाराष्ट्र राज्यात प्रथम पुरस्कार

Team RatnagiriLive
3 Min Read
  • राज्य कला प्रदर्शनातील सर्वोत्तम कलाकृती
  • विशाल मसणेला गुणवत्ता प्रमाणपत्र

संगमेश्वर : कला संचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे हि खूप मोठी व अभिमानाची बाब समजली जाते. यावर्षी घेण्यात आलेल्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कला महाविद्यालयातील विभागातून २५ विद्यार्थ्यांच्या ३० कलाकृतींची निवड झाली आहे. या निवडलेल्या कलाकृतींमधून शिल्पकला विभागातून विशाल गोवळकर याला राज्यातून प्रथम पुरस्कार मिळाला आहे तर विशाल मसणे याना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.

विशाल गोवळकर

विशाल गोवळकर यांची कलाकृती

या वर्षीचे ६४वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन नागपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. यामुळे एवढ्या कलाकृती प्रदर्शनात दिसणार हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे. निवड झालेल्या विद्यर्थ्यांची नावे खालीलप्रमाणे :
मूलभत अभ्यासक्रम – मिथिल अंगचेकर, विराज पाचाडकर, ज्योती पांचाळ,साहिल परुळेकर,आदित्य सावरटकर, अभिषेक जावळे. कला शिक्षक पदविका प्रथम वर्ष – तन्वी गोरीवले, धनंजय नलावडे,ऋतिक इनामदार, सोनल घाणेकर.कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष – प्रतिक गांजेकर, स्वरूप पवार.
रेखा व रंगकाला विभाग – तुळशी भुवड,सुजल निवाते, शुभम घोरपडे, शिल्प व प्रतिमानबंध कला – प्रथमेश गोंधळी,सार्थक आदवडे, भूषण थवी,चैतन्य मांडवकर,रुचित सांगळे, विशाल गोवळकर, ऋषिकेश पड्याळ, सोहम धामणस्कर,अध्वज चव्हाण, विशाल मसणे या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कला प्रदर्शनात झळकणार आहेत.

विशाल मसणे याची कलाकृती
विशाल मसणे

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

अन्नपाण्यासाठी प्राण्यांची भटकंती आपण अनेकदा पहात असतो. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली आहे. याबरोबरच अण्णासाहेब तुटवडा भासत आहे. अशावेळी वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याच्या घटनेत गेल्या काही वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या शोधात असणाऱ्या वन्य प्राण्यांच्या डोक्यात विविध प्रकारची भांडी अडकल्याचे आपण अनेक छायाचित्रात आणि चित्रफितीत पाहिले आहे. याच संकल्पनेचा आधार घेऊन प्राण्यांबाबत घडणाऱ्या घटनांचे वास्तव आपण आपल्या शिल्पाकृतीतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या शिल्पाकृतीला राज्य शासनाचा प्रथम क्रमांक मिळाला याबद्दल सह्याद्री कला महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मला नक्कीच अभिमान आहे. यासाठी मला प्राचार्य माणिक यादव, शिल्पकलेचे शिक्षक रुपेश सुर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

-विशाल गोवळकर, युवा कलाकार

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment