रत्नागिरीच्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांचे गोव्यातील खेकडा संवर्धन केंद्रात प्रशिक्षण

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत, शिरगांव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र सहा मधील विद्यार्थ्यांचे Aquaculture Engineering या विषयाअंतर्गत कार्यानुभव कालावधीमध्ये श्री. संपद देसाई यांच्या मालकीच्या नामांकित रिगल पेस्काटेक प्रायव्हेट लिमिटेड या खेकडा संवर्धन केंद्र, गोवा येथे सखोल अभ्यासासाठी कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रशिक्षणाअंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी खेकडा संवर्धनाचे तंत्रज्ञान, तंत्रज्ञानासाठी लागणारी यंत्रसामग्री, फिल्ट्रेशन यंत्रणा आणि त्याचे व्यवस्थापन व मार्केटिंग यांचा सखोल अभ्यास केला.

प्रशिक्षणामध्ये ओसामा खोत व प्रथमेश जाधव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना मत्स्य अभियांत्रिकी पदविकाचे माजी विद्यार्थी आणि रिगल पेस्काटेक कंपनीचे मॅनेजर श्री. शुभम पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी रिगल पेस्काटेक कंपनी यांच्या अधिकारी कर्मचारी सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment