जयगडच्या समुद्रात एल. ई. डी. नौकेवर कारवाई ; सामूग्री जप्त

Team RatnagiriLive
2 Min Read
  • एकूण तीन तांडेलांवर कारवाई

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर मत्स्य व्यवसाय खाते अधिक आक्रमक झाले असून अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी रात्री जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. यामधे ३ तांडेलांसह अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

दि. 7/03/2025 रोजी रात्री सुमारास जयगड समोर 17°20.10.5N 72°59.02.4E मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व श्री. स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) हे नियमित गस्त घालत होते.

यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली मोहम्मद हनिफ हसनमिया तांडेल, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी यांची नौका अल-हज-हसन- नों. क्र. IND-MH-4-MM-5701 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात जयगड समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. या नौकेवर नौका तांडेलसह 3 खलाशी होते.
ही नौका जप्त करून जयगड बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून ठेवण्यात आली आहेत. अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.
अंमलबजावणी अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व श्री. स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक जयगड श्री. सुजन पवार, व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक गुहागर विनायक शिंदे आणि सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment