पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची वाढदिवसानिमित्त पुस्तकतुला

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : रवींद्रनाथ टागोर नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखेच्या आनंद सोहळा पार पडला. यावेळी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त पुस्तकतुला करण्यात आली. राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.

कोमसापच्या माध्यमातून अभिजात मराठी साठी लोकचळवळ उभारणाऱ्या आणि मराठी भाषेच्या सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या ऋषितुल्य साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या 95 व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन आणि 5 पुस्तकांचे प्रकाशन सोहळा ना. सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौरव ठाकूर,  माजी खासदार रामशेठ ठाकूर, कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर, कोमसाप दादर शाखेच्या अध्यक्ष विद्या प्रभू, कोमसाप जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोज वराडे यांसह मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment