Apoorva Samant | महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदी अपूर्वा सामंत बिनविरोध

Team RatnagiriLive
1 Min Read
Apoorva Samant

रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे आणि रत्नागिरीच्या अपूर्वा सामंत (Apoorva Samant ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अपूर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या आहेत. त्या उच्चशिक्षित व तरुण उद्योजिका म्हणून परिचित आहेत.

सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रातील त्यांचा संक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या निवडीमळे कोकणातील उदयोन्मुख युवक-यवतींसाठी क्रिकेट क्षेत्रात नव्या संधींची दारे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषत कोकण पट्टयातील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे, स्थानिक स्तरावर क्रिकेट अकादमी, प्रशिक्षण सुविधा व स्पर्धा वाढाव्यात, यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

या निवडीमुळे कोकणातील युवाशक्तीला चालना मिळेल महाराष्ट्र क्रिकेटच्या प्रगतीला गती मिळेल, असे मत व्यक्त होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment