Monsoon alert | रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ते सकाळपर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तुरळक ठिकाणी कोसळल्या. पावसामुळे विविध ठिकाणी पाण्याची डबकी साचलेली पाहायला मिळाली.

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात 15 ते 18 मे 2025 या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरवत रत्नागिरी शहर परिसरासह जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला.
दरम्यान तत्पूर्वी गुरुवारी रात्री रात्रीपर्यंत वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास प सुरुवात झाली.

सलग पडत नसला तरी शुक्रवारी सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस कोसळत होता. यादरम्यान आकाशात ढगांची गर्दी झाल्याने वातावरण मळभयुक्त बनले होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment