रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली

Team RatnagiriLive
119 Views
1 Min Read

रत्नागिरी : मागील दोन वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली झाली आहे. या संदर्भातील आदेश शुक्रवारी निघाले आहेत.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा, बृहन्मुंबई येथे बदली करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ते रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश करण्यात करण्यात त्यांच्या कार्यकर्तेत महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली. जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेला त्यांच्या कार्याकरिता गालबोट लागेल असे उल्लेखनीय कृत्य घडलेले नाही. काश्मीर मधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार उचित कार्यवाही करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment