रत्नागिरी : गेले काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार समुद्र खवळलेला असतानाच गणपतीपुळे येथे सोमवारी उधाण आलेल्या समुद्राच्या लाटा तेथील गणपती मंदिराच्या संरक्षक भिंतीपर्यंत येऊन धडकल्या.
मुसळधार पावसामुळे आणि अमावास्येच्या पार्श्वभूमीवर समुद्राला उधाण आल्याने किनाऱ्यावर असलेल्या संरक्षण भिंतीच्या पायऱ्यांपर्यंत समुद्राच्या लाटा धडकलेल्या पाहायला मिळाल्या. या पार्श्वभूमीवर येथील किनाऱ्याला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटक तसेच भाविकांना मंदिर प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात येत होत्या. गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांची संख्या संख्या रोडावली आहे.
