उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे वादळी पावसामुळे नुकसान

Team RatnagiriLive
1 Min Read
  • नुकसानाची पाहणी करून आ. महेश बालदी यांनी दिली आर्थिक मदत

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात २५ मे २०२५ रोजी  पावसामुळे आणि वादळीवाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच तेथील जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज प्रत्येक्ष आमदार महेश बालदी या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.


यावेळी काही गरजूंना तातडीने आर्थिक मदत देखील करण्यात आली.तसेच या आपत्ती मधून पुन्हा उभं राहण्यासाठी प्रशासन सज्ज असून उरणचे तहसीलदार उद्धव कदम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मी प्रशासनाच्या संपर्कात असून उरणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.आपत्तीच्या या काळात कोणीही एकटं नाही असे मत यावेळी आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले. पाहणीवेळी तहसीलदार उद्धव कदम व कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment