कोकण रेल्वे मार्गावर दसरा- दिवाळीसाठी विशेष गाडी २० ऑक्टोबरपासून धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : दसरा- दिवाळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर २० ऑक्टोबरपासून विशेष गाडी धावणार आहे.

गाडी क्र. 01185 / 01186 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) (साप्ताहिक) विशेष

गाडी क्रमांक ०११८५ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु जं. (साप्ताहिक) विशेष लोकमान्य टिळक (टी) येथून 20/10/2023 ते 01/12/2023 पर्यंत दर शुक्रवारी 22:15 वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शनला ती दुसऱ्या दिवशी 17:05 वाजता पोहचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११८६ मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) (साप्ताहिक) विशेष मंगळुरू जंक्शन येथून दि. 21/10/2023 ते 02/12/2023 पर्यंत दर शनिवारी 18.45 वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी 14:25 वाजता ती लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम येथे थांबेल. रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल हे थांबे घेणार आहे.

या गाडीला एकूण 21 कोच असतील. यात टू टियर – 01 कोच, थ्री टियर एसी- 05 कोच, स्लीपर- 08 कोच, जनरल – 05 डबे, SLR – 02 अशी तिची कोच रचना असेल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment