मंडणगडमध्ये महसूल विभागातील तीन लाचखोर ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मंडल अधिकारी, तलाठ्यासह अन्य एका कर्मचाऱ्यांचा समावेश

मंडणगड : महसूल विभागाशी संबंधित कामासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह एकूण तिघांना अँटी करप्शन विभागाच्या रत्नागिरी येथील पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी उशिराने ही कारवाई करण्यात आली.

जमीन मिळकतीमध्ये फेरफार नोंद घालून तसा दाखला घेण्यासाठी म्हाप्रळचे मंडल अधिकारी अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसुल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे तसेच उपकोषागार कार्यालय मंडणगड येथील शिपाई मारुती भोसले यांना रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील पथकाने मंगळवारी सायंकाळी मंडणगड तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचून पकडले.

या संदर्भात कारवाईची पुढील प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment