एसटीच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचा भाजपप्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश

Team RatnagiriLive
1 Min Read
  • पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला प्रवेश

कणकवली :  रा.प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विभागीय कार्यशाळांमधील कर्मचाऱ्यांनी भाजपप्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी महासंघामध्ये प्रवेश केला. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओमगणेश निवासस्थानी हा प्रवेश पार पडला.
श्री. पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशांमध्ये श्री. रणसिंग, ए. एम. चव्हाण, ए. जी. आंबेरकर, एच. एम. पनवेलकर , एच एस खानोलकर, एस बी शिरकर, बी.पी ढेकणे, एस. एल. सांगवेकर, जे. व्ही. जाधव, एस. एस. ओठवणेकर, एस. पी. मापनकर, व्ही.एस. गुरव, एस. आर. कदम , सूर्यवंशी, सांगेलकर, सानप, अक्षय मिठबावकर यांनी प्रवेश केला.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी महासंघ सोडवू शकतो. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकतो म्हणून हा प्रवेश आपण करत असल्याचे प्रवेश करताना सांगितले.
यावेळी भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment