सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू

Team RatnagiriLive
1 Min Read
  • नागरिकांनी, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन

उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (७७ ) हिला सर्पदंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता तीचा रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( दि ४) घडली. नागरिकांनी अशा सर्पदंशाच्या घटनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेने केले आहे.
उरण तालुक्यातील सारडे येथील महिला महादूबाई माळी ही महिला बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरामध्ये एकटीच होती. त्यावेळी सर्वत्र लाईट ही गेल्याने तीने घराबाहेर पडताना बॅटरी घेतली नव्हती. पायला तिच्या काहीतरी चावला असे जानविले तिला असे वाटले कि विंचू चावला असावा. परंतु काही वेळाने मुले घरी आली असताना तिला अस्वस्थ जाणवू लागले होते. तिच्या मुलांनी तिला तात्काळ उपचारासाठी उरण च्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचार वेळेवर न मिळाल्याने तीचा रस्त्यातच मृत्यू झाला. सदर महिलेचा मृत्यू हा विषारी साप चावल्याने झाल्याची माहिती तिच्या कुटुंबाकडून तसेच सर्प मित्रांकडून सांगण्यात येत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment