Konkan Railway | मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १६ जूनपासून तीनच दिवस धावणार !

Team RatnagiriLive
3 Min Read

रत्नागिरी : भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी हे बदल १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहेत. या कालावधीत ही गाडी सध्याच्या सहा ऐवजी तीनच दिवस धावणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 15 जूनपासून लागू होत असले तरी पावसाळी वेळापत्रकातील डाऊन वंदे भारत एक्सप्रेसचीची फेरी 16 जून रोजी होणार असल्याने या दिवसापासून वंदे भारत एक्सप्रेसला हा बदल लागू असेल.


मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229) मान्सून वेळापत्रक :

  • आठवड्यातून तीन दिवस धावणार: मान्सून काळात ही ट्रेन सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
  • वेळापत्रक (सकाळी ५:२५ वाजता मुंबई CSMT येथून सुटेल)
  • मुंबई CSMT – सकाळी ०५:२५
  • दादर – सकाळी ०५:३२ आगमन, ०५:३४ प्रस्थान
  • ठाणे – सकाळी ०५:५२ आगमन, ०५:५४ प्रस्थान
  • पनवेल – सकाळी ०६:२५ आगमन, ०६:२७ प्रस्थान
  • खेड – सकाळी ०८:२४ आगमन, ०८:२६ प्रस्थान
  • रत्नागिरी – सकाळी ०९:४५ आगमन, ०९:५० प्रस्थान
  • कणकवली – सकाळी ११:१० आगमन, ११:१२ प्रस्थान
  • थिविम – दुपारी १२:१६ आगमन, १२:१८ प्रस्थान
  • मडगाव जंक्शन – दुपारी १३:१० आगमन
  • प्रवासाचा वेळ: मान्सून काळात प्रवासाचा वेळ साधारणतः १० तास ५ मिनिटे असेल.
    मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (22230) मान्सून वेळापत्रक:
  • आठवड्यातून तीन दिवस धावणार: ही ट्रेन मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
  • वेळापत्रक (दुपारी १२:२० वाजता मडगाव येथून सुटेल):
  • मडगाव जंक्शन – दुपारी १२:२०
  • थिविम – दुपारी १३:०६ आगमन, १३:०८ प्रस्थान
  • कणकवली – दुपारी १४:१८ आगमन, १४:२० प्रस्थान
  • रत्नागिरी – दुपारी १६:५५ आगमन, १७:०० प्रस्थान
  • खेड – दुपारी १८:४० आगमन, १८:४२ प्रस्थान
  • पनवेल – रात्री २१:०० आगमन, २१:०२ प्रस्थान
  • ठाणे – रात्री २१:३५ आगमन, २१:३७ प्रस्थान
  • दादर – रात्री २२:१५ आगमन, २२:१७ प्रस्थान
  • मुंबई CSMT – रात्री २२:२५ आगमन
  • प्रवासाचा वेळ: मान्सून काळात प्रवासाचा वेळ साधारणतः १० तास ५ मिनिटे असेल.
    प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी:
    मान्सून कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेच्या वेगात बदल केले जातात, त्यामुळे वेळापत्रकात बदल होतो. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट (www.enquiry.indianrail.gov.in) किंवा NTES ॲपवर अद्ययावित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
  • या बदलांमुळे प्रवाशांना मान्सूनमध्येही वंदे भारत एक्सप्रेसच्या सोयीस्कर प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment