गुम्बद सैतवडे दरिया मशिद येथील येथे शुद्ध पाण्याची पाणपोई सुरु

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मरहुमा नजमुन्निसा वहिद भोंबल यांच्या स्मरणार्थ उपक्रम

रत्नागिरी : गुंबद मोहल्ला गुंबद-सैतवडे येथील नौशाद वहिद भोंबल यांनी आपली आई मरहुमा नजमुन्निसा वहिद भोंबल हिच्या स्मरणार्थ शुद्ध पाण्याची पाणपोई दरिया मशिद गुंबद मोहल्ला गुंबद-सैतवडे येथे स्थापित करून दिली आहे.

ईद-अल-अधा चे अवचित्य साधून या पाणपोईचे दरिया मशिद इमाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी गुंबद येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या पाणपोईपासुन येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होईल. तसेच स्थापित केलेल्या पाणपोई जवळच मशिद, बँक, ग्रामपंचायत व बस स्टॉप असल्यानं तेथे येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व लोकांना या पाणपोईतून पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.

शुद्ध पाण्याच्या पाणपोईची सोय झाल्याने सर्व स्तरातून नौशाद वहिद भोंबल यांचे आभार व्यक्त होत आहेत.

ही पाणपोई स्थापित करून घेण्यासाठी तिथं उभे राहून त्यावर लक्ष देऊन काम पूर्ण करून घेण्यासाठी गुंबद मोहल्ला येथील रफीक खलफे व रज्जाक फकीर यांनी मेहन्नत घेतली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment