Mumbai Goa highway | निवळी घाटात मिनी बस-सीएनजी टँकरची भीषण धडक ; प्रशिक्षणाला जाणारे २५ शिक्षक जखमी

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : निवळी घाटात रविवारी सकाळी सुमारास एक भीषण अपघात घडला. चिपळूण येथून रत्नागिरीकडे शिक्षक प्रशिक्षणासाठी निघालेल्या खासगी मिनी बसला (ट्रॅव्हल्स) भरधाव वेगाने आलेल्या सीएनजी गॅस टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात सुमारे २५ ते २६ शिक्षक जखमी झाले आहेत.
अपघाताची ही घटना बावनदी परिसरात घडली. धडकेनंतर मिनी बस थेट सुमारे २ फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की मिनी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अनेक शिक्षक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती होऊ लागली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल, महसूल विभाग आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून सर्व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या दुर्घटनेत घटनास्थळी टँकर शेजारच्या एका घरावर आणि गुरांच्या गोठ्यावर कोसळला. त्यामुळे गोठा आणि घराचे फायबर पत्रे जळून खाक झाले असून दोन दुभत्या गायी जखमी झाल्या आहेत. घराजवळ उभी असलेली एक रिक्षाही पूर्णपणे जळून गेली आहे. मात्र मोठा आवाज ऐकून घरातील ७-८ व्यक्तींनी तत्काळ घराबाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सीएनजी टँकरमधील गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघातात जखमी झालेल्या शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे
1) संकेत कृष्णकांत जागुष्टे, चिपळूण.
2)विराज राजाराम सावंत,सावर्डे.
3) मंदा सुखदेव खाडे, सावर्डे.

4) स्मिता मधुकर पाटील, दहिवली
5) उषा अमोल खुडे, खेर्डी
6) जयश्री सूर्यकांत गावडे, सावर्डे
7) प्रियांका दिलीप जाधव, सावर्डे
8) नेहा संतोष मेस्त्री, सावर्डे
9) धर्मेंद्र दत्तात्रय देऊगडे, चिपळूण
10) दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे, सावर्डे
11) सुलक्षणा संभाजी पाटील, चिपळूण
12 ) निशिकांत दिनानाथ वानरकर, सावर्डे
13 )रूपाली सुकांत यादव, चिपळूण
14 ) श्वेता संजय चव्हाण, सावर्डे
15) हर्षाली हेमंत पाकळे, खेर्डी
16 )नीता विनायक बोंद्रे, चिपळूण
17) मीना सुभाष घाडगे, निवळी
18) सोनाली सावंत, गोवळकॊट
19) कमल किशोर विजय महाडिक –चिपळूण
20) प्रेम कुमार बबन शिवगण
21) अमोल गणेश कोतवाल, चिपळूण
22) मनीषा संतोष कांबळी, चिपळूण
23) मालिनी दीपक चव्हाण
24) श्वेता संजय चव्हाण
25) प्रियांका जाधव
26) राजेश यादव.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment