- महाराष्ट्रातील उद्योग मंत्र्यांचे जर्मनीत स्वागत
बर्लीन : जर्मनी दौऱ्यावर गेलो असताना फ्रँकफर्ट विमानतळावर “महाराष्ट्र बिजनेस डे”चे आयोजक श्री. अजित रानडे यांनी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वेलारसू आणि उद्योग विभागाचे सहसचिव श्री. श्रीकांत पुलकुंडवार, श्री. भरत गिते उपस्थित होते.
हा दौरा महाराष्ट्रातील उद्योगविश्वासाठी नवे संधीचे दरवाजे उघडणारा ठरेल, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील गुंतवणुकीला गती देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची ओळख भक्कम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असेही ते म्हणाले.
![]()
