कोकण रेल्वे मार्गावरील वन-वे स्पेशल ट्रेनचे आरक्षणही पोहोचले वेटिंगवर!

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर 14 जून 2025 रोजी धावणाऱ्या मुंबई मडगाव वनवे स्पेशल गाडीचे आरक्षण वेटिंगवर पोहोचले आहे. यावरूनच कोकण रेल्वे मार्गावर दिवसाच्या प्रवासासाठी अशा गाडीची किती गरज आहे, हे अधोरेखित झाले. आरक्षण खुले होतात अवघ्या तीन दिवसात या गाडीची सेकंड सेटिंगची सर्व तिकिटे बुक झाली आहेत.

या गाडीचे आरक्षण ७ जूपासून खुले झाले आहे. मुंबई -मडगाव मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर ही गाडी असणार आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई CSMT ते मडगाव जंक्शन दरम्यान एक विशेष ‘वन वे’ रेल्वे (गाडी क्रमांक ०११७१) दिनांक 14 जून रोजी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणवासीयांसाठी तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.
गाडी क्रमांक ०११७१: वेळापत्रक आणि थांबे
०११७१ मुंबई CSMT – मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ही गाडी मुंबई CSMT येथून १४ जून २०२५ रोजी सकाळी ०७:३५ वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री २२:३० वाजता ती मडगाव जंक्शनला पोहोचेल.

मंगळवारच्या आरक्षण स्थितीनुसार वनवे स्पेशलची सर्व तिकिटे संपून प्रतीक्षा यादी ३८ वर पोहोचली होती. 


दिनांक 15 जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस दोन रेक वापरून चालवली जाणार आहे. सध्या एकच गाडी जाण्याऱ्या व येणाऱ्या अशा दोन्ही फेऱ्यांरिता वापरली जाते. मात्र 15 जूनपासून यात बदल होणार आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार जनशताब्दी एक्सप्रेस जाण्यासाठी एक तर येण्यासाठी एक असे दोन रेक वापरून चालवली जाणार आहे. यासाठीच दुसरा रेक मुंबईतून गोव्यात कोकण रेल्वेच्या ताब्यात देण्यासाठी रेल्वेने या वनवे स्पेशल गाडीचे नियोजन केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment